Thursday, September 17, 2015

खेळ

मनाच्या या जगात रोज नवे खेळ सुरूच असतात 
कधी अलगद सुटतात तर कधी गुंत्यात अडकून पडतात 
कधी सुटलेले दोर परत अडकून  पडतात 
तर कधी अडकलेले दोर अलगद सुटत जातात 

विचारांचा वेग तर वाऱ्यापेक्षा पण जास्त असतो 
म्हणूनच प्रत्येकक्षणी वेगवेगळे अनुभव येत जातात 
या अनुभवांधुनच नवीन विचार जन्म घेतात 
आणि या विचारांमधूनच परत रोज नवे खेळ सुरुच असतात  

Wednesday, September 2, 2015

एक बार पीछे मुडके तो देखो

कूछ अजीब सा नशा है इस हवा मे
अपना ही गुरुर हे इस शहर मे
लोग भागते हे सिर्फ दो वक्त की रोटी कमाने के लिये 
पार वक्त ही नाही हे पीछे मुडके देखणे के लिये 

एक बार पीछे मुडके तो देखो 
गुजरे हुये लम्हे को निहार के तो देखो
जिंदगी तो ऐसेही निकल जायेगी 
जिंदगी जिने की कोई वजहखोजके तो देखो

उस वजह के साथ जिंदगी गुजार के तो देखो 
वक्त तो हल्केसे निकाल जायेगा 
और जो हात मी रेह जाये उसे निहर के तो देखो 
बस 
जिंदगी जिने के लिये कोई वजह खोजके तो देखो 
बस 
जिंदगी जिने के लिये कोई वजह खोजके तो देखो 

                                  ---अव्यक्त

घड्याळ कुणासाठी थांबतच नाही..

घड्याळ कुणासाठी थांबतच नाही
वेळ म्हणे खूप महत्वाचा असतो
म्हणे  पैशापेक्षा वेळ  जास्त महत्वाचा असतो
पण आमच्यासाठी हे घड्याळाला हे लक्षातच येत नाही
आणि घड्याळ आमच्यासाठी  थांबतच नाही

वेळेचं महत्व त्याला कोण समजावणार
आपली भाषा त्याला कोण शिकवणार
त्याची भाषा सेल आणि चावीची
आमची भाषा  मात्र लिहायची, वाचायची
आणि बोलायची...

वेळेसाठी आमचं घड्याळाबरोबर अडतं
पण उशीर झालं की वाटतं
वेळच महत्व त्याच्यापेक्षा कुणाला जास्त कळतं
                                             --- अव्यक्त

जिंदगी

ए जिंदगी कूछ रिश्ते अधुरे छोड के आ रहा हुं
कूछ ख्वाबो को पुरा करणे आ राहा हुं
क्या पतां कब मिल जाये मेरी तकदीर मुझे 
कूछ वादे निभाने आ राहा हुं
क्या पता कल का सुरज सामने क्या वक्त लायेगा 
पर पतां नही कल के सामने मेरा मन क्या साथ निभायेगा 
मे नाही चाहता की  मे यहां से हार के लोट जाऊ 
क्युंकी अब जितने का जुनून सर चढा हे मुझे 
बस हसते हुये ये जिंदगी जिना चाहता हुं
बस हसते हुये ये जिंदगी जिना चाहता हुं
ए जिंदगी कूछ रिश्ते अधुरे छोड के आ रहा हुं
कूछ ख्वाबो को पुरा करणे आ राहा हुं
                                            ---अव्यक्त


धरणी

आज ना मला पावसाचा थोडा राग आला 
का रे तू इतका उशीर केलास 
तू काही प्रेमात नव्हतास  झाला hurt
की म्हणून तू माझ्यापासून झालास divert
मी म्हणते काय चूक होती माझी 
आता वाटतय की तुझ्यावर प्रेम केलं 
हीच झाली चूक माझी 
येतांना न तुझं timing चं चुकतं
पण आपल्या लेकराचं management 
तुझ्यावरच अवलंबून असतं
वेंधळयासारखं नको रे वागत जाऊ 
इथे दुष्काळाचा होतोय बाऊ 
तू काही लवकर यायचा मिस call नाहीस देत 
अन त्याचा  दोरीबरोबरचा call पूर्ण व्हायला 
क्षणभरसुदद्धा लागत नाही वेळ..
                             ---अव्यक्त

मन

काही बोलण्यासाठी 
काही सांगण्यासाठी 
स्वतः जवळ 
कुणीतरी हवं आहे 
मनावरच ओझ कमी करायचं असेल बहुतेक 
किंवा 
प्रेमात पडायचं असेल बहुतेक
माझ्याच मनाच मला काहीच कसा काळत नाही 
वेड्या मनाच काहीच कसं सांगता येत नाही 
वात इतकी पाहताना 
दिवस सरता सरत नाही 
काय सांगू !!! 
या मनाला बांधून पण ठेवता येत नाही!!!! 
                                      ---अव्यक्त

चारोळी

१)
नजर आकाशी
काळजी उराशी
पावसाच्या विचारात
चिंताच मनाशी

२)
श्रावणाचे दिस आले
क्षण सारे आनंदीयाले
सरीबरोबर रंगण्यास
मातीचे मन उत्सुकले