Wednesday, September 2, 2015

घड्याळ कुणासाठी थांबतच नाही..

घड्याळ कुणासाठी थांबतच नाही
वेळ म्हणे खूप महत्वाचा असतो
म्हणे  पैशापेक्षा वेळ  जास्त महत्वाचा असतो
पण आमच्यासाठी हे घड्याळाला हे लक्षातच येत नाही
आणि घड्याळ आमच्यासाठी  थांबतच नाही

वेळेचं महत्व त्याला कोण समजावणार
आपली भाषा त्याला कोण शिकवणार
त्याची भाषा सेल आणि चावीची
आमची भाषा  मात्र लिहायची, वाचायची
आणि बोलायची...

वेळेसाठी आमचं घड्याळाबरोबर अडतं
पण उशीर झालं की वाटतं
वेळच महत्व त्याच्यापेक्षा कुणाला जास्त कळतं
                                             --- अव्यक्त

No comments:

Post a Comment