Thursday, September 17, 2015

खेळ

मनाच्या या जगात रोज नवे खेळ सुरूच असतात 
कधी अलगद सुटतात तर कधी गुंत्यात अडकून पडतात 
कधी सुटलेले दोर परत अडकून  पडतात 
तर कधी अडकलेले दोर अलगद सुटत जातात 

विचारांचा वेग तर वाऱ्यापेक्षा पण जास्त असतो 
म्हणूनच प्रत्येकक्षणी वेगवेगळे अनुभव येत जातात 
या अनुभवांधुनच नवीन विचार जन्म घेतात 
आणि या विचारांमधूनच परत रोज नवे खेळ सुरुच असतात  

No comments:

Post a Comment